Mumbai Rain Update : मुंबईत पावसाची दमदार हजेरी! रस्ते वाहतुकीला ब्रेक, विमान सेवांना लेटमार्क

मुंबई - मुंबईसह उपनगरराला गुरुवारी सकाळपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पावसाचे पाणी साचले होते. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण येथे पाणी साचल्याने लोकल सेवा १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या.

तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मरीनड्राइव्ह दरम्यान पाणी साचल्याने लोकल सेवा १० ते १५ मिनटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे मुंबईकरांना कार्यालयात पोहचण्यासाठी लेटमार्क लागला.

भारतीय हवामान खात्याने आज मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला होता. गुरुवारी सकाळपासून मुसळधार पावसाने मुंबई आणि मुंबई उपनगराला झोडपले असून उपनगरातीलतील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा धीम्या गतीने धावत होत्या. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. लोकल वाहतूक उशिराने धावत असल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांची काही प्रमाणात गर्दी रेल्वे स्थानकावर दिसून आली होती

Pune Terrorist News : पुण्यातून डॉक्टरला अटक, ISIS दहशतवादी संघटनेसाठी भरतीची होती जबाबदारी, NIA ची मोठी कारवाई

मध्य रेल्वे मार्गावरील दुपारी ४ वाजताच्या सुमारास कल्याण येथे पाणी साचल्याने लोकल सेवा १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. तर, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मरीनड्राइव्ह दरम्यान दुपारी १ वाजताच्या सुमारास पाणी साचल्याने लोकल सेवा धीम्या गतीने धावत आहे.

याशिवाय पावसामुळे हवेतील दृश्यमानता कमी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मोटरमन आणि लोको पायलटला रेल्वे गाड्यांचा वेग कमी करावा लागला होता. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले. रेल्वेची वाहतुक विलंबाने धावत असल्याने दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड लोकल गर्दीचा सामना करावा लागला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply