
Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पाऊस पुन्हा सुरु झाला. रविवारी मध्यरात्री एक वाजेपासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस मुंबईत झाला. त्यानंतर मुंबई हवामान विभागाने सोमवारी पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला. त्यानुसार दुपारी एक वाजता पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुंबईतील पावसामुळे सोमव्री विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. मुंबईतील कर्मचाऱ्यांना सुखरूप घरी जाता यावे म्हणून विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. विधानसभेचे कामकाज आता मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे. मुंबईतील पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असा सल्ला प्रशासनाकडून मुंबईकरांना देण्यात आला आहे.
|
Konkan Heavy Rain : तब्बल इतके दिवस रायगड किल्ला असणार पर्यटकांसाठी बंद ! |
आमदार, मंत्री अडकले
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाला शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे अनेक आमदार गावी गेले होते. रविवारी रात्री हे आमदार सोमवारच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी निघाले. परंतु रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पाऊस सुरु झाला. यामुळे विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदार रेल्वेत अडकले. मुंबईत रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याचा फटका दोन मंत्री आणि दहा ते बारा आमदारांना बसला. त्यात कॅबिनेट मंत्री अनिल पाटील, हसन मुश्रीफ, आमदार संजय गायकवाड, अमोल मिटकरी, जोगेंद्र कवाडे यांच्यासह इतर जणांचा समावेश आहे. आता सोमवारी पुन्हा मुसळधार पाऊस झाला. यामुळे मुंबई पुन्हा तुंबणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन विधानसभेचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियंत्रण कक्षात
पावसामुळे मुंबईतील प्रभावित क्षेत्रांची नियंत्रण कक्षामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. तसेच मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असा सल्ला दिला. नागरिकांनी मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन मी करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मुंबईतील शाळांनाही पावसामुळे सुट्टी देण्यात आली आहे. सकाळच्या सत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने काढले होते. त्यानंतर दुपारच्या सत्रातील शाळाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहर
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना



























Subscribe to my channel

