Mumbai Rain News : मुंबईसह राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाची हजेरी, आज अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता

Mumbai Rain News : मुंबई, ठाणे, नवी मुंबईत आज पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. वीजांच्या गडगडाटासह पावसाची रिमझिम परिसरात पाहायला मिळाली. हवामान विभागाने राज्यात अनेक भागात आज अवकाळी पावासाचा अंदाज वर्तवला होता.

अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर निघालेल्या तसेच मॉर्निंग वॉकला निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.  

मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, कांदिवली या परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

15 YRS Of 26/11 Mumbai Attack : फायरिंग आणि स्फोटांच्या आवाजाने हादरली होती मुंबई; ३ दिवस सुरु होता मृत्यूतांडव

नाशिकमध्येही पावसाची हजेरी

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. रात्रीच्या सुमारास १० ते १५ मिनिटे अवकाळी पाऊस बरसला. अवकाळी पावसाने कांदा रोपाचे नुकसान होण्याची शक्यत आहे. मात्र इतर रब्बी पिकांना फायदा होईल. नाशिक जिल्ह्यात आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

सिंधुदुर्गातही पावसाची रिपरिप

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागातही जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. रात्री तासभर कोसळलेल्या या पावसामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. कुडाळ, सावंतवाडी, कणकवली तालुक्यासह सह्याद्री पट्ट्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले.

आज अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता

राज्यात आज देखील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसासह गारपीटीची इशारा हवामान विभागाने दिला आहे.

तर पालघर, बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply