Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाच्या सरी; पुढील ३ ते ४ तासांत आणखीच जोर वाढणार, हवामान खात्याचा इशारा

Mumbai Rain News : गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता या अवकाळी पावसाची मुंबईत एन्ट्री झाली आहे. आज म्हणजेच मंगळवारी सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईच्या भल्यापहाटे कामावर निघालेल्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. 

ठाण्यात आणि कल्याण डोंबिवलीत आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईसह पश्चिम आणि पूर्व उपनगरात पाऊस सुरू आहे. मुलुंड, विक्रोळी, अंधेरीत पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई उपनगर आणि आजुबाजूच्या परिसरात सकाळपासूनच हलक्या पावसाच्या सरी बरसायाला सुरुवात झाली आहे.

मुंबई उपनगरातील अंधेरी, वर्सोवा, बोरिवली परिसरात रात्रीपासून अधुनमधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. सकापासूनच अधूनमधून पावसाच्या रिमझिम सरी कोसळू लागल्याने मॉर्निंगसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, पुढील तीन ते चार तासांत मुंबईत अवकाळी पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता सुद्धा हवामान खात्याने  वर्तवली आहे.

राज्यात धुमाकूळ घालणारा पाऊस मुंबईतही धुमाकूळ घालणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. मुंबईसह आजूबाजूच्या ठाणे आणि कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये रात्रीपासून ढग दाटले होते. यानंतर मुंबई पहाटे साडेपाच वाजेपासून पाऊस सुरू झाला. मुंबईसह उपनगरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.

मागील आठवडाभरापासून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अवकाळीमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. गहू, हरभरा, ज्वारी, बाजरीसह द्राक्ष, संत्रा, आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आता हा अवकाळी पाऊस मुंबईत बरसत आहे. मुंबईकरांची आजची सकाळ पावसाने सुरू झाली असून अद्याप सूर्यदर्शन झालेले नाही. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply