Mumbai Rain Alert : मुंबई-पुण्यासाठी पुढील 3-4 तास महत्वाचे; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain Alert : मुंबईसह पुण्यात आज शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघर परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. येत्या ३-४ तासांत मुंबईसह पुण्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

भारतीय हवामान खात्याने आज मुंबईसह, पुण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहेत. ठाणे, भिवंडी, पालघर तसेच कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवी मुंबईतही सध्या मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत.

Nilesh Lanke : गळ्यात कांद्याच्या माळा, डोक्यावर गांधी टोपी, खासदार निलेश लंकेंचं बैलगाडीतून कांदा, दूध दरासाठी आंदोलन

दिघा, ऐरोली, कोपरखैरणे, वाशी आणि नेरुळ विभागात जोरदार पाऊस पडत आहे.मागील अनेक दिवसांपासून नवी मुंबईकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. आता पावसाने जोर धरला असून यामुळे नवी मुंबईकर सुखावले आहेत.

दुसरीकडे ठाणे आणि भिवंडी परिसरातही सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे  भिवंडी शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे .

भिवंडी शहरातील तीन बत्ती ,भाजी मार्केट, बाजारपेठ ,कल्याण नाका, पटेल नगर,कमला हॉटेल परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तीन बत्ती,भाजी मार्केट परिसरात दोन फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. त्यामुळे भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे.

अनेकजण पाण्यामधून घरी जाण्यासाठी वाट काढत आहेत. तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेक वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असून वाहतूक देखील मंदावली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर परिस्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता आहे.

कोकणातही पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. आज सकाळपासून सर्वच तालुक्यात पाऊस दमदार पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये देखील चांगला पाणीसाठा झाला आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply