Mumbai Rain : मुंबईकरांनो, घरातून बाहेर पडू नका! IMD कडून ३ तास धोक्याचा इशारा, त्यात वाहतूककोंडी अन् लोकलला लेट मार्क!

Mumbai Rain : मुंबईसह पश्चिम उपनगरांत पहाटेपासूनच मुसळधार पावसाची सुरूवात झाली आहे. संततधारेमुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, दहिसर, सांताक्रुझ, वांद्रे यांसह पश्चिम उपनगरातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्यानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील तीन तास अतिशय धोकादायक मानले जात आहेत.

आज आठवड्याचा पहिला दिवस असून, पहाटेपासूनच पावसाचा जोर कायम आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून, त्यासोबत पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. या प्रभावामुळे संपूर्ण राज्यभर पावसाचा जोर वाढल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं.

Maharashtra : भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

संततधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका मुंबईतील कामगारांना बसत आहे. एक्सप्रेसवेवर ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईची लोकल देखील उशीरानं धावत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पाच ते दहा मिनिटं उशिरानं, हार्बर रेल्वे ५ मिनिटं, तर पश्चिम रेल्वे सुरळित सुरू आहे. पावसाची संततधार अशीच सुरू राहिली तर, रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो.

पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, पालघर, ठाणे या भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण तसेच परिसरातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये मध्यरात्रीपासूनच पाऊस सुरू आहे.

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *