
Samruddhi Mahamarg Accident News : गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. दररोज समृद्धी महामार्गावर किरकोळ आणि भीषण अपघात होत आहे. एकीकडे महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाने गांधीगिरी सुरू केली असताना, दुसरीकडे समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे.
शिर्डीहुन छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. जखमीला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कार अतिवेगाने शिर्डी कडून संभाजीनगरकडे येथे जात असतांना मागील उजव्या बाजूचे टायर हे तुटून बाजूला गेल्या गाडीवरील ताबा सुटला आणि कार पलटी झाली. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये एकूम ३ जण होते.
यात तीन जणांपैकी २ जणांचा मृत्यू झाला असून १ जण जखमी आहे. जखमी व्यक्तीला तात्काळ ॲम्बुलन्स मध्ये औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी पाठवले आहे. सुर्यकांत वडणे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे तर अनिज शेख आणि प्रतीक देशमुख अशी मृत व्यक्तीची नावे आहेत. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. तेव्हापासून अपघातांचे प्रमाण कमी होण्याचे नावच नाही. समृद्धी महामार्ग अपघाताचा सापळा ठरत आहे.
शहर
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
महाराष्ट्र
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा


























Subscribe to my channel

