Mumbai-Pune Highway : मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर हद्दीत कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

Mumbai-Pune Highway : मुंबई-पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर हद्दीत कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संदीप दिलीप बर्वे (वय 48 वर्षे) असं मृत कार चालकाचे नाव आहे. ते डोंबिवली येथील रहिवासी आहेत. त्यांचे शव पुढील कार्यवाहीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खालापूर येथे लोकमान्या रुग्णालयात घेऊन पाठवण्यात आलं आहे.

Pimpri Chinchwad Crime : कासरवाडीच्या युवकांकडून वाहनाची तोडफोड, पाच जणांवर गुन्हा दाखल, एकास अटक

या अपघातात एक महिलेसह 9 जण जखमी झाले आहेत. यात एका सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. या अपघात सुमन बर्वे (वय 68 वर्ष) यांना गंबीर दुखापत झाली आहे, असं सांगण्यात येत आहेत.

त्यांच्या व्यतिरिक्त अश्वजीत बर्वे वय 13 वर्ष, प्रणव बर्वे वय 5 वर्ष, आदेश बर्वे (वय 3 वर्ष), अनिकेत बर्वे (वय 19 वर्ष), प्रिया बर्वे (वय 18 वर्ष), गौरव बर्वे (वय 17 वर्ष), कियारा बर्वे (वय 6 महिने) यांना किरकोळ स्वरूपाचा दुखापती झालेल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी वाहनाने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे रवाना करण्यात आलेले आहे.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *