Mumbai-Pune Expressway Traffic Update : 'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वर आज पुन्हा दुपारी २ ते ४ यावेळेत ब्लॉक; जाणून घ्या महत्वाची अपडेट

Mumbai-Pune Expressway Traffic Update : मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जागोजागी पाणी साठून जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहयला मिळत आहे. यादरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. तुम्हा देखील आज मुंबई पुणे प्रवासाचे नियोजन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.

मुंबई पुणे महामार्गावर काल रात्री पुन्हा दरड कोसळल्याने आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी २ ते ४ यावेळेत हा ब्लॉक असणार आहे. तसेच या वेळेत महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात येणार आहे. प्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळण्याची घटना ताजी असताना गुरूवारी रात्री कामशेत बोगद्याच्या तोंडाजवळ पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली. गुरूवारी रात्रीच्या सुमारासदरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली असली मात्र अजूनही कामशेत बोगद्याच्या तोंडाजवळ काही प्रमाणात कोसळलेल्या दरडीचा भाग रस्त्यावरच आहे.

Maharashtra ISIS Module Case : NIA ची पुण्यात मोठी कारवाई ! महाराष्ट्र इसिस मॉड्युलप्रकरणी कोंढव्यातील डॉक्टरला अटक

त्यामुळे आज दुपारी २ ते ४ यावेळेत मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक किवळे पासून वळवली जाणार आहे. तर मुंबई शहराकडे येणारी वाहने जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने सुरू असेल आणि ती लोणावळ्याजवळ पुन्हा द्रुतगती मार्गाशी जोडली जाईल. तसेच महामार्गाहून पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरूच राहील.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply