Mumbai-Pune Expressway : देशातील पहिला एक्सप्रेस वे महाराष्ट्रात, महागड्या 'एक्स्प्रेस वे वर टोल किती?

Mumbai-Pune Expressway : देशात सध्या नवे नवे महामार्ग आणि द्रुतगती बांधले जात आहेत, त्यामुळे प्रवास आणखी वेगवान होत आहे. मागील ७० वर्षांमध्ये देशात अनेक एक्सप्रेस वे बांधण्यात आले. मोठ्या शहरांना जोडण्यासाठी आणि दळणवळण अतिशय वेगात होण्यासाठी या एक्स्प्रेस वेचा फायदा होतो. पण देशातील सर्वात महागडा आणि पहिला एक्स्प्रेस वे महाराष्ट्रात आहे. होय.. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतामधील पहिला एक्सप्रेस वे आहे. २००२ मध्ये हा एक्सप्रेस वे लोकांसाठी खुला करण्यात आला होता. २५ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या या एक्सप्रेस वे वरून सर्वाधिक वाहतूक होतेय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेची वैशिष्ट्य आणि टोल टॅक्सबद्दल जाणून घेऊयात.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गाच्या बांधकामासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 94.5 किलोमीटरच्या या एक्स्प्रेस वेसाठी अंदाजे 1,630 कोटी रुपये खर्च आलाय. MSRDC ने (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) बांधलेला हा एक्सप्रेस वे नवी मुंबईतील कळंबोली येथून सुरू होतो अन् पुण्यातील किवळे येथे संपतो. मुंबई-पुणे एकस्प्रेस वे मुळे दोन शहरे जवळ आली. एक्सप्रेस वे वरील टोल वर्षाला सहा टक्के वाढवण्यात येतो. पण तीन वर्षांनी एकत्रपणे १८ टक्के लागू करण्यात येतो.

Santosh Deshmukh Case : राज्यातील ग्रामपंचायती ९ जानेवारीला बंद, सरकारकडे काय केल्या मागण्या?

एक्सप्रेस वेवर टोल किती?

एक्स्प्रेस वेची डागडुजी एप्रिल २०२३ मध्ये अखेरची करण्यात आली. त्यानंतर टोलच्या किंमती वाढवण्यात आल्या. साध्या वाहनांसाठी २७० रूपयांवरून ३२० रूपये इतका टोल करण्यात आला. मिनीबस आणि टेम्पो यासारख्या वाहनांसाठी 495 रुपये करण्यात येत आहेत. १६ चाकी ट्रकचा टोल 585 रुपयांवरून ६८५ रुपये इतका करण्यात आला. बसेससाठी सध्या ९४० रूपये इतका टोल आकारण्यात येतो. 2030 पर्यंत टोलचे दर (Mumbai-Pune Expressway Toll Hike: Key Highlights and Future Plans Until 2030) हेच राहणार आहेत, त्यामध्ये कोणतीही सुधारणा केली जाणार नसल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेबद्दल या गोष्टी माहित आहेत का? Here are some of the interesting facts about the Mumbai-Pune Expressway

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एसएसआरडीसीने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बांधला आहे.

१९९९ मध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा काही भाग लोकांसाठी खुला करण्यात आला होता. २००२ मध्ये पूर्ण एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

या एक्स्प्रेस वेचे एक टोक राज्याची राजधानी मुंबईला आहे, तर दुसरे टोक सांस्कृतिक राजधानी पुण्याला आहे.

या एक्स्प्रेस वेसाठी अंदाजे १६३० कोटी रूपयांचा खर्च आला.

कळंबोली (नवी मुंबई) ते कळवे (पुणे) यादरम्यान 94.5 किमी लांब एक्स्प्रेस वे आहे.

या एक्स्प्रेस वे मुळे मुंबई आणि पुण्यातील प्रवासाचे अंतर दोन ते तीन तासांनी कमी झाले.

प्रत्येकवर्षी सहा टक्क्यांनी टोलच्या किंमती वाढवण्यात येतात, पण प्रत्येक तीन वर्षानंतर १८ टक्क्यांनी अंमलात येतात.

एप्रिल २०२३ मध्ये एक्स्प्रेस वेवरील डागडुजीचे काम करण्यात आले. त्यानंतर २०३० नंतरच टोल वाढणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply