Khopoli : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; IIT मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, लोणावळ्याजवळ सकाळी दुर्घटना

Khopoli : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरच मृत्यूने घाला घातल्याची धक्कादायक घटना मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर घडली. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या भीषण अपघातामुळे एक्सप्रेसवे पुन्हा एकदा ‘डेथ ट्रॅप’ ठरला असून, केवळ दोन दिवसांत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुरूवारी सकाळी लोणावळ्याजवळ झालेल्या या भीषण अपघातात आयआयटी मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

कार पलटी झाल्यामुळे अपघात
आज सकाळी तीन तरूण लोणावळ्यावरून मुंबईच्या दिशेने निघाले होते. या वेळी त्यांची पोलो कार पलटी होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ओमकुमार बोरसे (वय 23), लय भारत (वय 22) आणि श्रेयांश शर्मा या तीन तरुणांचा कारमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. हे तिघेही पवई येथील आयआयटी मुंबई येथे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण काल मुंबईहून कारने लोणावळा येथे गेले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे ते पुन्हा मुंबईकडे परतत असताना एक्सप्रेसवेवर कार रेसिंग सुरू झाले. ओव्हरटेकच्या नादात पोलो कार पलटी होऊन हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.



शहर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *