Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशीही मोठी वाहतूक कोंडी, मज्जा करायला निघालेल्या नागरिकांचा हिरमोड

Raigad : सलग सुट्ट्यांमुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील मंडळी पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. मात्र मज्जामस्ती करण्यासाठी निघालेल्या नागरिकांना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर कालपासून वाहतूक कोंडी कायम आहे. एक्सप्रेस वेवर दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बोरेघाटातील अमृतांजन कमानपासून खोपोलीकडे वाहनाच्या रांगा 24 तास उलटूनही कायम आहेत.

वीकेंड आणि 15 ऑगस्ट व पारसी न्यू इयरच्या सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक मुंबई बाहेर पडत आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभर व रात्री ते रविवारी सकाळपर्यंत वाहतूक कोंडी कायम आहे. बोरघाट वाहतूक पोलीस सतत वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Kalwa Hospital News : धक्कादायक! ठाणे मनपा रुग्णालयात एका रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

 

सलग सुट्टी असल्याने लोणावळा, महाबळेश्वर, कोल्हापूर अशा पर्यटन स्थळे जाऊन सुट्टीचा आनंद पर्यटक घेत आहेत. दरम्यान, वारंवार प्रशासनाच्या वतीने विनंती करूनही पर्यटक आपल्या खाजगी वाहनाने प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडील जाणाऱ्या लेनवर बोरघाटात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply