Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ५ वाहनांना विचित्र अपघात, बोगद्यात टेम्पो उटल्याने वाहतूक कोंडी

Mumbai-Pune Express Way : मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवरील नवीन बोगद्यात अपघात झाल्याची घटना घडली. पाच वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण किरकोळ जखमी झाला. अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही पण वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातात एक टेम्पो बोगद्यात उलटल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्याचे हाल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटातील नवीन बोगद्यात अपघात झाला. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर आज पहाटे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण जखमी झाला. पाच वाहन एकमेकांवर आदळल्याने वाहनांचं मोठ नुकसान झालं.

SPPU Admission 2025: पुणे विद्यापीठात प्रवेश परीक्षा अर्ज प्रक्रियेला सुरुवात, या तारखेपर्यंत मुदत

सिमेंट बल्कर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याची धडक पुढील चार वाहनांना बसून हा अपघात झाला. या अपघातामध्ये सिमेंट बल्करचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात बोगद्यामध्ये एक टेम्पो उलटला असून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात वेळ गेल्याने मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील किलोमीटर ३९ जवळ मुंबईच्या मार्गिकेवर ५ वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एक टेम्पो नव्याने बनवलेल्या बोगद्यामध्ये उलटल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. टेम्पो सरळ करत सर्व अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. दरम्यान या घटनेमुळे मुंबई मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागून वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र काही काळानंतर वाहतूक सुरळीत झाली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply