
Dombivli : गेल्या काही दिवसांत भाजप आणि शिवसेना पक्षात एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या गटात खेचून घेण्याची चढाओढ सुरू आहे. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे एकाच मंचावर दिसल्याने, दोन्ही पक्षांमधील तणाव निवळल्याचे म्हटले जात होते. मात्र आता पुन्हा एकदा या दोघांमधील ‘कोल्ड वॉर’ उघड झाल्याचे दिसून येत आहे.
डोंबिवली पश्चिम येथील पॅनल क्रमांक २२ मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत अपेक्षित आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने दिवंगत माजी नगरसेवक आणि केडीएमसीचे माजी सभापती वामन म्हात्रे यांचे बंधू बाळा म्हात्रे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे भाजपने वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे यांना उमेदवार करण्याची आखणी केली असून, काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात मोठी चर्चा रंगली होती.
|
Mumbai : दहिसर–भाईंदर फक्त ५ मिनिटांत! ४५ मीटर रुंदीचा एलिव्हेटेड रोड उभारणार; बीएमसीची मोठी घोषणा |
डोंबिवली पश्चिममधील पॅनल २२ च्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “आपले वामन म्हात्रे योग्य लढत होते. त्यांचा खरा आशीर्वाद बाळा म्हात्रे यांनाच आहे.
वामन म्हात्रे म्हणायचे, ‘मी जिथे जातो तिथे सत्ता येते’ आणि ते खरे ठरायचे. बाळा म्हात्रे आपल्याकडे आहेत, त्यामुळे याचा अर्थ तुम्ही समजून घ्यावा.”
यानंतर रवींद्र चव्हाण यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “प्रत्येकजण काहीतरी आपापल्या पद्धतीने बोलत असतो. सर्वांना माहिती आहे की वामन म्हात्रे आणि माझे किती जवळचे संबंध होते. त्यांनी अनेक वेळा माझ्यावर आशीर्वाद ठेवला आहे आणि हे सिद्धही झाले आहे. वामन म्हात्रे यांची मुलगी भांडुपमध्ये भाजपची नगरसेविका आहे. युती झाली किंवा नाही,
अनमोलला आशीर्वाद द्यावा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे मी ठरवले की अनमोल यांनाच वामन म्हात्रे यांच्या आशिर्वादाची परंपरा मिळाली पाहिजे. माझा आशिर्वाद तर आहेच.” त्यामुळे शिंदे आणि चव्हाण यांच्यातील मतभेद पुन्हा स्पष्ट झाले आहेत.
दिवंगत नगरसेवक वामन म्हात्रे हे शिवसेनेचे पाच वेळा नगरसेवक राहिले होते, त्यापैकी एकदा ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. तसेच ते केडीएमसीचे तीन वेळा सभापती म्हणूनही कार्यरत होते.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

