Mumbai : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई! अवैध मद्याच्या ३६३ बाटल्या, ६४ किलो तंबाखूजन्य पदार्थ जप्त

मुंबई : मध्य रेल्वेचा सुरक्षा दलाने आरपीएफने गेल्या महिन्याभरात ८४ हजारांचे ६४ किलो अनधिकृत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. तसेच एक लाख किंमतीच्या अवैध मद्याच्या ३६३ बाटल्या जप्त करून ४ जणांना अटक केली आहे.

रेल्वेतून अनधिकृत साहित्यांची वाहतूक रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ)ने वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या आहेत. यातून मे २०२३ मध्ये आरपीएफ विभागाने ६४ किलो वजनाचे आणि ८४ हजार रुपयांचे अवैध तंबाखूजन्य पदार्थांची १४ पाकिटे जप्त करण्यात आली.

याशिवाय १ लाख १९ हजार ६८० रुपये किमतीची अवैध मद्याच्या ३६३ बाटल्या जप्त करून ४ जणांना अटक करण्यात आली. दरम्यान लोकल, मेल/एक्स्प्रेमधून मद्य, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ घेऊन प्रवास करू नका, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply