Mumbai News : लोकसभेतील नरेटीव्ह खोडण्याचा भाजपचा प्रयत्न! सर्व ITI कॉलेजमध्ये उभारणार 'संविधानाचे मंदिर'; मंगल प्रभात लोढांची घोषणा

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची भूमिका संविधानविरोधी असल्याचे सांगत विरोधकांनी आवाज उठवला होता. ज्याचा मोठा फटका मोदी सरकारला बसल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेतील या अजेंड्याची धास्ती घेऊन भाजपने विधानसभेसाठी सावत्र पवित्रा घेतला असून मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणुकांमधील संविधान बदलाचा नरेटीव्हचा भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला. भाजपला संविधान बदलण्यासाठी ४०० पार जागा हव्या आहेत, असा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला. विरोधकांच्या या दाव्यामुळे लोकसभेत पिछेहाट झाल्याने आगामी विधानसभेसाठी महायुतीने सावध पाऊले टाकायला सुरूवात केली आहे.

Jayakwadi Dam Lavel : नाशिकच्या दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; जायकवाडीचा पाणीसाठा झपाट्याने वाढला

लोकसभेतील संविधान बदलाचा नरेटीव्ह खोडण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येणार आहे. यासंदर्भात कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा राज्यातील सर्व आयटीआयमध्ये भारतीय 'संविधानाचे मंदिर' तयार होणार असल्याची सर्वात मोठी घोषणा केली आहे.

'संविधान मंदिरा'ची प्रतिकृती तयार करण्यात येणार असून आयटीआयमध्ये संविधानाच्या विचारांची शिकवण दिली जाणार आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी ही घोषणा केली होती. त्याचबरोबर गावागावात संविधानाचे विचार व महत्व पोहचवण्यासाठी उपक्रम राबवले जाणार आहेत.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply