Mumbai News : रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाने वापरला EVM अनलॉक करणारा फोन; तपासातून खळबळजनक माहिती

Mumbai News : खासदार रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनवापर प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. ईव्हीएम मशीनशी जोडलेला फोनच वायकरांच्या मेहुण्याला वापरायला दिल्याची माहिती मिळत आहे. याच मोबाईल फोनने ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याच मोबाईलवर आलेल्या ओटीपीने ईव्हीएम मशीन अनलॉक केले गेले. पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप केला जातोय. मतमोजणी केंद्रात फोनचा वापर करण्यास मनाई होती. पोलिसांनी फोन जप्त करून FSL ला पाठवला आहे.

Maharashtra Politics : आमदार रोहित पवार यांना पक्षात मिळणार मोठी जबाबदारी? पडद्यामागे हालचाली सुरू

आता फोनवरील बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत. तसेच पंडीलकर यांनी कोणाशी बोलणं केलं, याचा देखील पोलीस तपास करणार आहे. दोघांनाही ४१(अ) ची नोटीस बजावत हजर राहण्याचे समन्स पाठवण्यात आले आहेत. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्यामतमोजणीच्या निकालाविरोधात अमोल किर्तीकरांनी निवडणूक आयोगात धाव घेतली होती.

अमोल किर्तीकर यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभानिवडणुकीच्या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी मतमोजणी कक्षात मोबाईल वापरल्याप्रकरणी रविंद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता या प्रकरणात मोठमोठे खुलासे होत आहेत. धक्कादायक माहिती समोर येत आहे. वायकरांनी  कीर्तिकरांचा अवघ्या ४४ मतांनी पराभव केलाय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply