Mumbai News : ऑनलाईन आईसस्क्रिम मागवताय, सावधान! आईसस्क्रीममध्ये सापडलं माणसाचं बोट

Mumbai News : तुम्ही जर ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी. एका व्यक्तीनं ऑनलाईन आईसस्क्रीम मागावलं. ते आईस्क्रीम खाताना त्या व्यक्तीच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण त्या आईस्क्रीममध्ये चक्क माणसाच्या हाताचं बोट आढळून आलं. 

यंदाचा उन्हाळा जरा जास्तच कडक आहे. त्यामुळे आईसस्क्रिमची मागणी वाढलीय. बाजारात वेगवेगळ्या फ्लेव्हरमध्ये आईसक्रीम उपलब्ध आहे. ऑनलाईन आईसस्क्रीम मागवणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र आता तुमच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही.. ही साधीसुधी आईस्क्रिम नक्कीच नाही. या आईस्क्रिममध्ये चक्क माणसाचं बोट आढळून आलंय. 

Alibaug News : फिरायला गेला अन् काळाने घाला घातला; अलिबागच्या समुद्रात बुडून पुण्यातील तरुणाचा मृत्यू

अनेकांच्या मनात सवाल उपस्थित झाले आहेत. कोणता आईसस्क्रिमचालक आपल्या ग्राहकांना अशी आईसस्क्रिम देऊ शकतो? यात काही काळंबेरं आहे का? साम टीव्हीनं या व्हिडीओची पडताळणी केली. तेव्हा घडलेला सगळा प्रकार समोर आला.

ब्रँडन फेराओ नावाच्या व्यक्तीनं यम्मो आईसस्क्रिमवरून ऑनलाईन आईसस्क्रीम मागवली होती. त्यानं अर्ध्याहून अधिक आईसस्क्रीम खाल्ली. मात्र त्याचवेळी आईसस्क्रीममध्ये गडबड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या आईसस्क्रीममध्ये माणसाच्या हाताचं बोट होतं. ब्रँडन स्वत: डॉक्टर असल्यानं त्यांनी तत्काळ हे बोट बर्फात ठेवलं आणि पोलिसांना याची माहिती दिली.

याप्रकरणी मालाड पोलिसांनी यम्मो आईसस्क्रिमविरोधात गुन्हा दाखल केलाय. तसच बोटाचे अवशेष फॉरेन्सिंक तपासणीसाठी पाठवले आहेत. आता आईसस्क्रिममधलं हे बोट नेमकं कुणाचं आहे? यामागे काही काळंबेरं तर नाही ना? याचा उलगडा पोलिस तपासानंतरच होईल.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply