Mumbai : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ऑफिसबाहेर व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न, मंत्रालयातील घटनेने पोलिसांची धावपळ

Mumbai  : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून ४६ वर्षीय व्यक्तीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. सुरेश जगताप असं या व्यक्तीचं नाव आहे. हा व्यक्ती मुळचा सातारामधील फलटण येथील रहिवाशी आहे.

सुरेश जगताप २ ऑगस्टच्या दुपारी मंत्रालयातील पास घेऊन मंत्रालयातील ६ व्या माळ्यावरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोरील लॉबीत आला होता. त्यानंतर कुणाला काही समजायच्या आत आणि सुरक्षारक्षकांचा डोळा चुकवत आत्महतेचा प्रयत्न केला. स्वत:च्या डाव्या मनगटावर वार करून स्वत:ला जखमी करून घेतले. 

Manora Aamdar : राज्यातील लोकप्रतिनिधींना मिळणार 40 मजली आमदार निवास; सुविधा पाहून व्हालं आवाक्

पोलिसांनी तत्परता दाखवत वेळीच सुरेश यांना उपचारासाठी जीटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात सुरेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ४१ अ १ अन्वेय अंतर्गत नोटीही जारी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मरीन ड्राईव्ह पोलीस करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply