Mumbai : अशोक खरात यांची संपत्ती, ६३ एकर जमीन, आलिशान बंगला आणि फार्महाऊस; एकूण मालमत्ता तब्बल ४० कोटींच्या पुढे!

Mumbai : मिरगाव येथे ३३ एकर, पाथर्डी गावात दहा एकर, सिन्नरमध्ये दहा एकर, अहिल्यानगरात साडेचार एकर, शिर्डी विमानतळाजवळ साडेपाच एकर, नाशिक, पनवेल, संगमनेर येथे प्लॉट, बंगला, शेतघर, विविध बँकांमध्ये खाती अशी एकूण ४० कोटी ८७ लाख रुपये मूल्याची मालमत्ता आतापर्यंत अशोक खरातकडे आढळून आली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खरातच्या मालमत्तांचा तपशील सादर केला. खरातने प्राप्तिकर चुकवला का, याचा तपास सुरू असून याप्रकरणी कोणीही दोषी आढळला तर त्याला पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. खरात देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी विमान प्रशासनाकडे लूकआऊट नोटीस जारी केली होती.

अशोक खरातच्या संपत्तीविषयी माहिती घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्याने पत्नी आणि मुलीच्या नावाने अनेक ठिकाणी मालमत्ता घेतल्याचे त्यांनी सांगितले. खरातचे कोणकोणत्या बँकांमध्ये खाती आहेत, याचाही तपशील मुख्यमंत्र्यांनी दिला. अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, यूएई, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया, मलेशिया, केनिया, युगांडा आदी देशांमध्ये खरातने प्रवास केल्याची माहिती तपासात समोर आली. त्याने नातेवाइकांच्या नावावर संपत्ती घेतली किंवा कसे, याचीही चौकशी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी खरात प्रकरणात काही सरकारी अधिकाऱ्यांनी माहिती असूनही कारवाई केली नाही. राजकारणातील काही लोकांची नावे आणि फोटो समोर आले आहेत. हे पुरोगामी राज्य आहे. त्यामुळे अशावेळी जे कोणी यात अडकले आहेत त्यांची चौकशी करणार का, असा प्रश्न विचारला. जाधव यांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘ज्या ज्या व्यक्तीविरोधात पुरावे मिळेल त्या सर्वांची चौकशी करू. आपण सर्व राजकारणात आहोत. कुणाचा फोटो कुणासोबत येतो हे आपण पाहिले आहे. फक्त कुणाचा फोटो कुणासोबत आहे यावरून कुणालाही आरोपी करता येत नाही. पण खरातच्या मोबाईलमधील डीलिटेड डेटाही काढत आहोत. त्यात कुणाचा संपर्क होता का? कुणी त्याच्याशी आर्थिक व्यवहार केला का? मेसेज केले का, याची चौकशी केली जाईल’.

खरात देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती. तसे झाल्यास शोधणे कठीण झाले असते. त्यामुळे पोलिसांनी विमान प्रशासनाकडे लुकआऊट नोटीस जारी केली होती. बावी आणि शिर्डी पोलिसांच्या तपासात गंभीर बाबी समोर आल्यानंतर दोन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापन करण्यात आली. १७ मार्चला रात्री संबंधित महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातने दैवी शक्तीचा खोटा दावा केल्याची तक्रार दिली. पतीच्या मरणाची भीती घालून इच्छा नसताना वारंवार बलात्कार केला असेही तक्रारीत नमूद केल्याने खरातवर गुन्हा दाखल कऱण्यात आला. यानंतर त्याला अटक करण्यात आली असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “Mumbai : अशोक खरात यांची संपत्ती, ६३ एकर जमीन, आलिशान बंगला आणि फार्महाऊस; एकूण मालमत्ता तब्बल ४० कोटींच्या पुढे!

Leave a Reply to Daniel1904 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *