Mumbai News : धावत्या लोकल ट्रेनच्या चाकाला आग; प्रवाशांची पळापळ, थरकाप उडवणारा VIDEO

Mumabi Local Train Fire : मध्ये रेल्वेच्या कसारा सीएसटी लोकल ट्रेनने पेट घेतला कसाराहून मुंबई सीएसटी कडे जात होती. कसाऱ्याहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी ट्रेन ही कसाऱ्याहून सकाळी 8:18 ला सुटली होती. या घटनेचा थरकाप उडवणारा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही ट्रेन असनगाव रेल्वे स्टेशना कडे जात असताना आसनगाव ब्रीज जवळ आल्यावर या ट्रेनमधून अचानक धूर निघायला लागला. यामुळे ट्रेन मध्ये बसलेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र 15 ते 20 मिनिटांनंतर पुन्हा ही ट्रेन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना करण्यात आली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून अचानक धूर निघू लागला. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी मध्येच लोकल थांबवली आणि खाली उतरले. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. मोठ्या प्रमाणात धूर येत असल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अनेक प्रवाशांनी लोकलमधून खाली उड्या टाकल्या. ब्रेकमध्ये घर्षण झाल्याने लोकलच्या चाकाला आग लागल्याचे समोर आले. त्यामुळे स्थानकावर एकच गोंधळ उडाला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply