
Mumbai : मुंबई महापालिका निवडणूक झाल्यानंतरही महापौरपदासह विविध समिती अध्यक्षपदांचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे गट नोंदणीही होऊ शकलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने तीन दिवस पाळण्यात आलेला दुखवटा आणि काही नगरसेवकांनी ९ आणि १० फेब्रुवारीला आंगणेवाडी जत्रेमुळे नंतरच महापौर निवडणूक घेण्याची केलेली मागणी यामुळे महापौर निवडणूक १० फेब्रुवारीनंतरच होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापौर पदाकडे लक्ष
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर महापौर कोणाचा होणार याकडे लक्ष आहे. महायुतीकडून यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यातच भाजप आणि शिवसेनेमध्ये स्थायी, सुधार, शिक्षण, बेस्ट यासह अन्य समित्यांचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी चढाओढ आहे. यावर अंतिम निर्णय झालेला नसतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वतंत्ररित्या गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय मागे पडला आणि भाजप-शिवसेनेने एकत्र गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. अद्याप तरी ही गट नोंदणी झालेली नाही.
|
|
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य सरकारने तीन दिवस, शुक्रवारपर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. तोपर्यंत एकत्रित गट नोंदणी व अन्य प्रक्रियेबाबत काही निर्णय होणार नाही. शनिवारी-रविवारी कोकण भवन बंद असल्याने गट नोंदणी करण्याची प्रक्रिया आता पुढील आठवड्यातच होण्याची शक्यता आहे.
सात दिवसांचा अवधी
गट नोंदणीनंतर महापौर निवडणुकीसाठी सूचना काढली जाते. यामध्ये सात दिवस दिले जातात आणि त्यात नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जातात. त्यानंतरच निवडणूक होते. ही प्रक्रिया फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे. त्यातच आंगणेवाडीची जत्रा असल्याने ९ आणि १० फेब्रुवारीला महापौर निवडणूक नको, त्याआधी किंवा नंतर घ्यावी, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर निवडणूक घेणे शक्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यातच महापौर निवडणुकीची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. महापौर निवडणूक लांबणीवर पडल्यास महापालिकेतील अन्य वैधानिक समित्यांच्या निवडणुकाही उशिरा पार पडतील.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel


1 thought on “Mumbai Mayor : ९-१० फेब्रुवारीला निवडणूक नको; ‘या’ कारणामुळे नगरसेवकांची मागणी, महापौर निवड दुसऱ्या आठवड्यात?”