Mumbai Local : मुंबई एसी लोकलमधील बत्ती गुल; भर पावसात उकाड्याने प्रवाशी घामाघूम

Mumbai News: एसी लोकलने प्रवास करताना प्रवाशांना थंडाव्याची अपेक्षा असते. मात्र, नुकताच प्रवाशांना एका एसी लोकलने जाताना अपेक्षाभंगाचा अनुभव दिला. दादरहून विरारकडे जाणाऱ्या एसी लोकलमध्ये अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे गाडीत असलेले एअर कंडिशन यंत्र बंद पडले शिवाय चाकरमानी गरमीने घामाघूम झाले. या गोंधळामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली. सध्या या सर्व प्रकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्हाला एसी लोकलमधील(Local Train) लाईट गेलेली दिसत असून सर्वत्र काळोख पसरलेला आहे. अशातच एसी लोकलमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. जर तुम्ही पाहिले तर लोकलमधील लाईट गेल्याने दरवाजेही उघडलेले आहेत आणि प्रवाशी लटकून प्रवास करत आहेत. हा धक्कादायक प्रकार एका एसी लोकलमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद करत सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

Pune Shivsena : पुण्यात ठाकरे गटाला खिंडार, आणखी एका शिलेदाराने साथ सोडली

लोकलमधील हा प्रकार दोन दिवसांआधीचा असल्याचे कळत असून हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील mirabhayanderka या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे शिवाय फेसबूक, ट्वीटर(एक्स) अशा प्रसिद्ध माध्यमांवरही शेअर करण्यात आलेला आहे.

प्रवाशांसह नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया

एसी लोकलमधील हा प्रकार पाहताच सोशल मीडियावर(Media) प्रत्येकाने संताप व्यक्त केलेला आहे. काहींनी ''ही अत्यंत लजास्पद बाब'' असल्याचे म्हटलं आहे तर दुसऱ्या यूजरने म्हटलं की,''कशासाठी येवढे पैसे भरायचे'' तर अशा प्रकारे अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply