Mumbai Local : मध्य रेल्वे विस्कळीत, बदलापूरजवळ मालगाडीचे इंजिन बिघडले; प्रवाशांचे हाल

 

Mumbai Local  : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे कर्जत आणि मुंबईच्या दिशेला येणारी लोकल वाहतूक उशिराने सुरू आहे. लोकल २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. मालगाडी कर्जतच्या दिशेने जात असताना इंजिनमध्ये बिघाड झाला. अर्ध्या तासानंतर मालगाडी कर्जतच्या दिशेने रवाना झाली. पण याचा फटका लोकल वाहतुकीला बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर रेल्वे स्थानकात मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत आणि मुंबईच्या दिशेकडील लोकल वाहतूक २५ ते ३० मिनिटं उशिराने सुरू आहे. सकाळी ११ च्या सुमारास कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मालगाडी बलदापूर रेल्वे स्थानकावरच थांबून होती.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा बळीराजाला फटका? लाडक्या बहिणीमुळे सिंचन योजनेचं अनुदान थकलं

मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे याचा फटका मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीला बसला. ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. बदलापूरसह सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईच्या दिशेला कामाला येणाऱ्याचे हाल होत आहे. थोड्या वेळापूर्वीच ही मालगाडी कर्जतच्या दिशेने रवाना झाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply