Mumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, वांगणी-बदलापूरमध्ये रेल्वे रुळाला तडा

Mumbai Local Train Latest News : वांगणी आणि बदलापूरमध्ये रेल्वे रूळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत लोकल वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे दिसत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक बदलापूर आणि वांगणीदरम्यान ठप्प झाली आहे. याचा परिणाम एक्सप्रेस गाड्यावरही झाल्याचे समोर आले आहे. सकाळी कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना लेट मार्क लागणार आहे.

मध्य रेल्वेच्या वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने आज सकाळी अप आणि डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. रुळाला तडा गेल्याने कल्याण ते सीएसएमटी आणि कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. यामुळे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण आदी स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली.

Mumbai : भावंडं खेळत होती, नराधमानं बागेत नेलं, १० वर्षीय चिमुकलीचे लचके तोडले; मुंबईत खळबळ

अनेक प्रवासी कार्यालयात वेळेवर पोहोचू शकले नाहीत, तर काहींना पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा आधार घ्यावा लागला. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, दुसरे इंजिन मागवून रुळ दुरुस्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. “ऐन सकाळी अशी अडचण येणे खूप त्रासदायक आहे. रेल्वेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,” अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने व्यक्त केली. लवकरच मध्य रेल्वेवरील वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. रेल्वेकडून दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *