Mumbai High Court : १० टक्के पीडितांना विनामुल्य न्याय मिळवून द्या; न्यायमूर्ती रेवती मोहिते - डेरे यांचे वकिलांना आवाहन

Mumbai High Court : न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांचा वकील-न्यायाधीश यांच्या माध्यमातून निवाडा लवकरात लवकर कसा करता येईल याबद्दल प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्ये न्यायमूर्ती रेवती मोहिते - डेरे यांनी व्यक्त केले आहे. राजगुरूनगर येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 
यामुळे उद्घाटन सोहळ्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते - डेरे यांनी उपस्थित वकील आणि न्यायाधीशांना त्यांचे कर्तव्य सांगत काही सूचना केल्या आहेत. पीडितांना न्याय मिळवून देणे हे वकीलांचे कर्तव्य आहे. वकील-न्यायाधीश यांच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणाचा निवाडा लवकरात लवकर कसा करता येईल याबद्दल प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.
 
समाजातील १० टक्के नागरिकांचे विना मोबदला काम करण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून द्या असे आवाहन मोहिते-डेरे यांनी केले. प्रत्यक्षात न्यायाधीश आणि वकिलांनी असे केल्यास बहुसंख्य पीडितांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply