Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज अवजड वाहनांना बंदी; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Mumbai-Goa Highway :  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आज म्हणजे शुक्रवारी महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. यामधून अत्यावश्यक सेवेला वगळण्यात आलं आहे. 

रायगड जिल्ह्यातील लोणारे येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार उपस्थित राहणार आहे.

Coronavirus : JN.1 व्हेरियंटचा राज्यात झपाट्याने फैलाव, रुग्णसंख्या 110वर, पुण्यात सर्वाधिक रुग्ण

त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील जवळपास ७५ हजार नागरिक देखील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

हीच बाब लक्षात घेता रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, वाहतूक पर्यायी दिशेने वळवण्यात आली आहे.

पाली वाकण मार्गाने कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या अवजड वाहनांना ही बंदी घालण्यात आली आहे. गोवा मार्गे येणारी अवजड वाहने सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते १० या कालावधीत मोरबे मार्गे वळविण्यात येणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply