Mumbai ED raid : मशीन गन, बंदुका, परदेशी चलन, दागिन्यांसह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त; ईडीची मुंबईत मोठी कारवाई

Mumbai ED raid : ईडीचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकांकडून १६४ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केले आहे. ईडीने आरोपीकडून एमपी-५ सब मशीन गनसह अन्य दोन बंदुका तसेच १५० जिवंत काडतूस जप्त केली आहेत. तसंच हिरेन भगत यांच्यासह ५ आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखा कक्ष ९ ने आरोपींना अटक केली आहे. 

परदेशी चलन रोख रक्कम जप्त

एनकाउंटर स्पेशलिस्ट दया नायक याप्रकरणी तपास करत आहेत. यासोबतच १३.६ कोटी रुपयांचे परदेशी चलन आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तसंच ५.१ कोटी रुपयाचे दागिने जप्त करण्यात आले  आहेत. दुबईतील मालकीच्या मालमत्तेची कागदपत्रे आणि महागडी घड्याळे देखील जप्त करण्यात आली आहेत.

Solapur News : BSC परीक्षेत विद्यार्थ्यांना ५० पैकी ९९ गुण; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील अजब प्रकार

ईडीच्या वेगवेगळ्या केसेसची कागदपत्रे, आरोपपत्र, डिस्चार्ज ॲप्लिकेशन, क्लोजर रिपोर्ट देखील गुन्हे शाखेच्या हाती लागली आहेत. हिरेन भगतच्या अटकेनंतर आणखी तीन व्यावसायिकांचा याप्रकरणात समावेश असल्याचं देखील समोर आलं आहे. याप्रकरणी ईडीचे अधिकारी सामील असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

काय आहे प्रकरण

ताराचंद मूलचंद वर्मा यांच्याकडून १६४ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ६ जणांना अटक केली. दाखल केलेल्या तक्रारीनुसार ६ जानेवारीला एका अज्ञात व्यक्तीने ताराचंद यांना कॉल केला होता. ईडीचा अधिकारी असल्याचं सांगून त्याने खंडणी मागितली होती. त्यानंतर त्यांची १० जानेवारीला वांद्रे येथील एका कॉफी शॉपमध्ये बैठक देखील झाली होती.

वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा

आरोपीने ईडीचा अधिकारी असल्याचा खोटा दावा केला. तसंच दुसऱ्या बांधकाम व्यावसायिकासोबत झालेल्या व्यवहारात १६४ कोटी रुपयांची तडजोड करण्याची धमकी दिली होती. ताराचंद वर्मा यांना खंडणीची रक्कम द्यायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला.

तक्रार दाखल केल्यानंतर कॉफी शॉपमधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. यामध्ये आरोपींची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून रविवारी चौघांना तर सोमवारी एकाला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. तर सहाव्या आरोपीला मंगळवारी अटक केली आहे. याप्रकरणी आता ईडी प्राथमिक चौकशी करत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply