Mumbai Crime : MPSC च्या क्लासमध्ये तरुणीचा विनयभंग; संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Andheri Crime : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून महिला सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व येथे MPSCचे क्लास घेणाऱ्या संचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या क्लासमध्ये रिसेप्शनिस्टच्या पोस्टसाठी इंटरव्यू देण्यासाठी आलेल्या तरुणीचा संचालकाने विनयभंग केल्याचा प्रकार घडलाय. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अंधेरी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. कुटुंबीयांना हातभार लागावा यासाठी ती तरुणी जवळपासच्या परिसरात नोकरी शोधत होती. यासाठी तिने आपला बायोडेटा नोकरी मिळवून देणाऱ्या वर्क इंडिया अॅपवर अपलोड केला. अॅपद्वारे, तिला अंधेरी पूर्व येथे असलेल्या एका क्लासमध्ये रिसेप्शनिस्टच्या रिक्त जागेबद्दल माहिती मिळाली.

पुढे ती त्या ठिकाणी इंटरव्यू देण्यासाठी गेली असता आरोपीने मुलाखत घेताना त्या तरुणीसोबत चुकीचा व्यवहार करत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. वडील भाऊ यांच्या बद्दल माहिती घेऊन तुला बॉयफ्रेंड आहे का आणि तो तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवतो की नाही असे आरोपीने तरुणीला विचारले. तिच्या हाताला व गालाला स्पर्श केला. या सर्व प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने तिच्या कुटुंबीयांना संपूर्ण घटना सांगून अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

अंधेरी पोलिसांनी संचालकाविरुद्ध भादवी कलम 354, 354A, 509 आणि 201 नुसार हा गुन्हा दाखल करून आरोपीस चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सागर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने आपण अभिनेता असल्याचा दावा केला होता. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply