
Mumbai : मुंबईच्या वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवघ्या 38 दिवसांच्या लहान बाळाचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळाची विक्री करण्याच्या उद्देशाने हे अपहरण करण्यात आले असल्याचे समजते. बाळाचे अपहरण करणाऱ्या चार जणांच्या टोळीचा वनराई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बाळाला सुरक्षित आणि सुखरूपपणे त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे.
अपहरण झालेल्या बालकाचा शोध घेण्यासाठी परिमंडळ 12 च्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा टीम तैनात करण्यात आल्या. सहा दिवस अहोरात्र मेहनत करत तब्बल 11000 रिक्षा चालक आणि एक लाखाहून अधिक मोबाईल नंबर तसेच हजारो सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात वनराई पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी मुंबईच्या मालवणी मालाड परिसरातून चारही आरोपींना अटक केली. सध्या आरोपी हे वनराई पोलिसांच्या ताब्यात असून या आरोपींनी यापूर्वी मुंबईत अशाप्रकारे कुठे लहान मुलांची चोरी करून विक्री केली आहे का, याबाबत वनराई पोलीस अधिक तपास करत आहे
|
Pune : विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरात वाहतूक बदल, वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन |
मिळालेल्या माहितीनुसार,सुरेश सलाट व त्यांची पत्नी सोनी सलाट हे जोडपे आपल्या तीन लहान मुलांसोबत गुजरात येथून मुंबईत दोन मार्च रोजी चादरी विक्रीकरीता आले होते. दिवसभर वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरेगाव परिसरात त्यांनी सादरी विकल्या आणि रात्रीच्या वेळी त्यांना वसईला जाण्याकरीता त्यांना रेल्वे न मिळाल्याने ते फुटपाथवर झोपले.त्याच दरम्यान त्यांचा 38 दिवसाचा मुलगा पहाटे सर्व कुटुंबीय गाढ झोपले असताना अज्ञात व्यक्तीने पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरी (अपहरण) करून घेऊन गेले. मात्र झोपेतून उठल्यानंतर त्यांचा सर्वात लहान मुलगा गायब असल्याचे समजतात त्यांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
आई-वडिलांच्या तक्रारीवरून वनराई पोलिसांनी कलम १३७ (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून घेतला. परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त स्मिता पाटील व दत्तात्रय ढोले, सहाय्यक पोलीस आयुषव दिंडोशी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु माने यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या लहान मुलाचा शोधासाठी पोलिसांची सहा पथके तयार केली.याचदरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये अंगात एका व्यक्ताने हुडी घातली असल्याचे दिसून आले. यानंतर वनराई पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये दिसणारी पिवळ्या रंगाच्या रिक्षाचा नंबरही स्पष्ट दिसत नव्हता. यामुळे पोलिसांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील सर्व पिवळ्या रंगाच्या मागील दोन वर्षात आलेल्या रिक्षांचा शोध घेतला. त्यासोबतच पोलिसांनी एक लाख पेक्षा अधिक मोबाईल नंबरधारकांची तपासणी करत आरोपी मालाड मालवणी परिसरातून शोधून काढला.
सलग सहा दिवस वनराई पोलिसांच्या सहा टीमने अहोरात्र मेहनत घेत सापळा रचून आरोपी राजू मोरे आणि मंगल मोरे यांच्या घरावर पाळत ठेवून नऊ तारखेला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आरोपींना अटक केली. आरोपींच्या घरी तो लहान मुलगा आढळून आला, त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतर वनराई पोलिसांच्या तपास पथकाने ते बाळ आपल्या मूळ आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
याप्रकरणी वनराई पोलिसांनी मुख्य आरोपी राजू मोरे, मंगल मोरे, फातिमा जिलानी शेख, आणि मोहम्मद आसिफ मोहम्मद उमर खान यांना विक्रीसाठी लहान मुलाच्या चोरी करणे प्रकरणे अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी यापूर्वी कधी लहान मुलाची चोरी करून विक्री केली आहे का? किंवा लहान मुलं चोरी करणाऱ्या टोळीच्या हे लोक संपर्कात आहेत का, यासंदर्भात वनराई पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel
