Mumbai : धक्कादायक! पत्नी सोबत रहात नाही, पतीने दिली दादर, कल्याण रेल्वे स्टेशन उडून देण्याची धमकी

Mumbai : दादर आणि कल्याण रेल्वे स्टेशनला बॉम्बने उडवून देण्याची धमकी शुक्रवारी मध्यरात्री मिळाली होती. याप्रकरणी वसईच्या पेल्हार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याची पत्नी त्याच्या सोबत राहात नाही, या नैराश्येतून त्यांने त्याने रेल्वेला धमकी दिल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. विकास उमाशंकर शुक्ला असं संशयिताचं नाव आहे.

मुंबईतील सर्वात जास्त प्रवाशांची वर्दळ असलेले दादर आणि कल्याण रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी ९ मार्च रोजी ११ सुमारास पेल्हार पोलीस ठाणे बिट मार्शलला मिळाली होती. ११२ कन्ट्रोल रुम मिरा- भाईदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय, मिरारोड येथेही फोन करण्यात आला होता. त्यामुळे या घटनेचं गांभीर्य ओळखून तपासासाठी पोलीस पथक नेमण्यात आलं होतं. त्यानंतर अवघ्या काही तासातच संशयीत विकास शुक्ला, ओमसाई चाळ, वनोठापाडा, पेल्हार, येथे असल्याचे समजलं. पोलिसांनी त्याला तात्काळ गाठलं. तो एका गाळ्यात फोन बंद करून लपून बसला होता. पोलिसांनी शटर उचकटून ताला ताब्यात घेतलं. त्याने ठाणे व मुंबई कन्ट्रोलला देखील कॉल केल्याचं समोरं आलं आहे.

Bribe Case : आरोग्य कॅम्पसाठी २० हजाराची लाच; वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात

दरम्यान पोलिसांना खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने धक्कादायक माहिती दिली आहे. त्याची पत्नी गेल्या दीड वर्षापासून त्याच्यापासून वेगळी राहात होती. पत्नी दादर येथे कामाला जात होती आणि कल्याण राहात होती. त्यामुळे त्यांने पत्नीला घाबरवण्यासाठी रेल्वेला धमकी दिल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. मात्र या एका कॉलमुळे सगळी यंत्रणा हादरून गेली होती आणि कामाला लागली होती. आज त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

भोईवाडा, पोलीस ठाणे, सायन पोलीस ठाणे ,विनोबा भावे पोलीस ठाणे, ठाणे एटीसी दहशदवादविरोधी पथक ,माटुंगा पोलीस ठाणे, रेल्वे क्राईम ब्रँच, विकासला शोधण्यासाठी जंग जंग पछाडत होते. अखेर मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त, मधुकर पांडेय अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहाययक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक, कुमारगौरव धादवड,, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सोपान पाटील,पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, सचिन कांबळे, योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, पो.अं. संजय मासाळ, रवि वानखेडे, किरण आव्हाड, मिथुन मोहिते, राहुल कर्पे, दिलदार शेख, निखिल मंडलिक, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, नितीन सांगळे, शंकर सुळ यांनी सापळा रचून विकास शुक्ला याला अटक केली



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply