Mumbai Crime : दादर सुटकेस प्रकरणात नवा ट्विस्ट, अर्शदच्या पत्नीला अटक, हत्येचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले

Mumbai Crime : दादरमधील सुटकेस प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अर्शद अली शेखच्या (३० वर्षे) हत्ये प्रकरणी त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली. पायधुणी पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली. अर्शदच्या हत्याप्रकरणात त्याची पत्नी रुक्सानाचा देखील सहभाग असल्याचे तपासादरम्यान कळताच पोलिसांनी चौकशी करत तिला अटक केली. अनैतिक संबंधातून अर्शद अली शेखची हत्या झाल्याचे तपासातून उघड झाले आहे. अर्शदच्या हत्येसाठी कट रचण्यात आला होता. याप्रकरणात आतापर्यंत ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दादर रेल्वे स्थानकात लाल रंगाच्या ट्रॉली बॅगेत अर्शद अली शेखचा मृतदेह सापडला होता. या हत्या प्रकरणात पायधुणी पोलिसांनी अर्शदच्या पत्नीला अटक केली. अर्शदची पत्नी रूक्सानाचा देखील या हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे पोलिसांना आढळून आले. रूक्सानाचे अर्शदचा मित्र आणि या प्रकरणातील आरोपी जय चावडासोबत विवाहबाह्यसंबंध होते. यातूनच अर्शदची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. अर्शदची पत्नी रूक्साना ही देखील मूक बधिर आहे.

Pune Eco Sensitive Zone : पुणे जिल्ह्यातील 413 गावे 'इको सेन्सिटिव्ह झोन'मध्ये, कोणत्या गावात कोणते प्रकल्प, कोणत्या कामांवर असणार निर्बंध?

पायधुनी येथे राहणाऱ्या जय चावडाने शिवजीत सिंग आणि अर्शद अली शेखला दारू पिण्यासाठी बोलावले होते. त्याचवेळी तिघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले. यावेळी जयने शिवजीत सिंग याच्या मदतीने अर्शदची हत्या केली. अर्शदला नग्न करत हात-पाय बांधून बेदम मारहाण केली. त्यानंतर हातोड्याने क्रूरपणे त्याला ठार मारण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह बॅगेत भरून विल्हेवाट लावण्यासाठी जय चावडा तुतारी एक्स्प्रेसने कोकणात जाण्याच्या प्रयत्नात होता. पण दादर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी त्याला अटक केली.

अर्शदच्या हत्येनंतर शिवजीत सिंग फरार झाला होता. त्याला पोलिसांनी उल्हासनगरमधून अटक केली. अर्शदची हत्या करताना आरोपींनी मित्रांना व्हिडीओ कॉल केले होते. हत्या करताना बेल्जियमचा नंबर असलेल्या एका अनोळखी व्यक्तीला आरोपींनी व्हिडिओ कॉल केला होता. ही व्यक्ती कोण आणि त्यांचा या सगळ्यांशी काय संबंध होता याचा तपास पोलिस करत आहेत. या हत्याप्रकरणात पोलिसांनी जय चावडा, शिवजीत सिंग आणि रूक्साना अर्शद अली शेखला अटक केली आहे. आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply