Mumbai Crime : मुंबई हादरली! अडीच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईकडून बॉयफ्रेंडला प्रोत्साहन

Mumbai Crime : मुंबईच्या मालाडमधील मालवणी भागातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईच्या प्रोत्सनातूनच आपल्या अडीच वर्षीय मुलीवर प्रियकराकडून अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आबहे. मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी पॉक्सो कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून 30 वर्षीय आई आणि 19 वर्षीय नराधम प्रियकराला अटक केली आहे.

मालाड मालवणी परिसरात राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेने आपल्या अडीच वर्षाच्या मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला. यामुळे डॉक्टरांनी महिलेची विचारपूस केली. यावेळी महिलेने मुलीचा मृत्यू झोपेत श्वास गुदमरून झाल्याचे सांगितले. मात्र डॉक्टरांचा यावर विश्वास बसला नाही. डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी केली असता मृतदेहाच्या गुप्तांगावर रक्ताचे डाग आढळून आले. यामुळे काहीतरी गैरकृत्य झाले असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी मालवणी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली.

Pune Corona Virus: धोक्याची घंटा! मुंबईपाठोपाठ पुण्यात आढळला कोरोना रुग्ण; पुणेकरांची चिंता वाढली

पोलिसांनी रुग्णालयात जाऊन मृत बालिकेच्या आईची चौकशी केली. तिने घडलेल्या प्रकाराची कबुली दिली. यावरून मालवणी पोलिसांनी तीस वर्षीय महिला आणि 19 वर्षीय नराधम प्रियकर यांच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. आरोपी महिला आणि 19 वर्षीय आरोपी मुलामध्ये कथित प्रेमसंबंध होते. महिलेचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. महिला गरोदर असताना तिच्या पतीने तिला सोडले होते. तिने एका मुलीला जन्म दिला होता. तेव्हापासून आरोपी महिला तिच्या आईच्या घरी राहत होती.

तपासादरम्यान आरोपीने अडीच वर्षांच्या मुलीवर तिच्या आईसमोर बलात्कार केला असल्याचे कबूल केले. चिमुकली वेदनेने ओरडत होती आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालाच्या आधारावर पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकराविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply