Mumbai Breaking News : मोठी बातमी! मुंबईत येत्या १८ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश; नेमकं कारण काय?

 

Mumbai Breaking News : मुंबईकरांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. पुढील महिनाभर मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात शांतता राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, बुधवारी (२० डिसेंबर) मध्यरात्रीपासून नवीन वर्षातील १८ जानेवारीपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू असणार आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून परिपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे. 

पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात कलम १४४ लागू करण्यात आल्याने ५ किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

Maratha Reservation : मंत्री गिरीश महाजन आज मनोज जरांगेंची भेट घेणार; २४ डिसेंबरची डेडलाईन वाढवून मिळणार?

याशिवाय जाहीर सभा घेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार जमावबंदीच्या कालावधीत शहरात लाऊडस्पीकर, बँड आणि फटाके फोडण्यावर बंदी असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. 

  • मुंबईत १८ जानेवारीपर्यंत लाऊड स्पीकर, वाद्ये आणि बँड वाजवण्यास तसेच फटाके फोडण्यास बंदी असेल.

  • कलम १४४ लागू करण्यात आल्याने ५ किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल.

  • जमाबंदीच्या काळात सभा तसेच आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

  • यादरम्यान मुंबईत कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

  • न्यायालये, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांभोवती लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई असेल.

  • सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी आणि निदर्शने करण्यास बंदी असेल.

  • मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

  • या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply