Mumbai Fire : मोठी बातमी! मुंबईतील भाजप कार्यालयाला आग, परिसरात धुराचे लोट

Mumbai : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे. याचदरम्यान, मुंबईत भाजप कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. कार्यालयातील किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरु असताना ही आग लागली. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आगीवर नियत्रंण मिळविण्याचं काम सुरु आहे

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील नरिमन पाँईट भागात असणाऱ्या प्रदेशाला आग लागल्याची घटना घडली. भाजच्या या कार्यलयातून पक्षाच्या संघटनेचे काम पाहिले जाते. या कार्यालयात बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाचेही कार्यक्रम होतात. आज रविवार असल्याने पक्ष कार्यालयात डागडुजीचं काम सुरु होतं.

Pune Crime : पुण्यातील नव्या मुळशी पॅटर्नची राज्यात चर्चा; गोळीबार झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील नरिमन पाँईट भागात असणाऱ्या प्रदेशाला आग लागल्याची घटना घडली. भाजच्या या कार्यलयातून पक्षाच्या संघटनेचे काम पाहिले जाते. या कार्यालयात बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाचेही कार्यक्रम होतात. आज रविवार असल्याने पक्ष कार्यालयात डागडुजीचं काम सुरु होतं.

या कार्यालयातील किचनमध्ये वेल्डिंगचं काम सुरु होतं. त्याचवेळी ही आग लागली. शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर धुराचे लोट हवेत पसरू लागले. कार्यालयात आग लागल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच धावपळ उडाली. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु केलं आहे.

तत्पूर्वी, कार्यालयाला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून सध्या कुलिंग ऑपरेशनचे काम सुरू आहे.

नरिमन पाँईटजवळ महाराष्ट्र भाजपचे प्रदेश मुख्यालय आहे. तर मुंबईच्या दादर येथेही भाजपचे कार्यालय आहे. या घटनेनंतर भाजप नेते प्रसाद लाड, राहुल नार्वेकर घटनास्थळी पोहोचले. तसेच इतर भाजप कार्यकर्ते देखील घटनास्थळी उपस्थित झाले.

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply