Mumbai Airport: परदेशातून भारतात आणत होता १५ कोटींचे अंमली पदार्थ, DRI ने मुंबई एअरपोर्टवर कारवाई करत केली अटक

Mumbai News: मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआरआयच्या ( DRI) अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. परदेशातून भारतामध्ये आणण्यात येणारे 1,496 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. अदीस अबाबावरुन मुंबईत हे कोकेन आणण्यात येत होते. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात १५ कोटी रुपयांच्या आसपास किंमत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई विमानतळावरून 1,496 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 15 कोटी रुपये इतकी आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. अदीस अबाबा येथून हे कोकेन मुंबईत आणण्यात येत होते. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर सामानाची तपासणी करताना डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

Jalgaon RL Jwellers : राजमल लखीचंद ज्वेलर्सवरील कारवाई अन्यायकारक; कायद्याला धरून नाही, जळगावच्या सराफ व्यावसायिकांची प्रतिक्रिया

याप्रकरणी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी एकाला मुंबई विमानतळावरुन अटक केली. आरोपीने मोठ्या शिताफीने लेदरच्य बॅगेमध्ये हे कोकेन लपवून आणले होते. पण हे कोकेन मुंबईत आणण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणाचा पुढील तपास करत असताना युगांडाची नागरिक असलेली महिल्या एका महिलेला नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एकूण 2 आरोपींना डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सतत चौकशी आणि पाळत ठेवल्यानंतर आणि डीआरआयच्या अधिकाऱ्यांद्वारे सावधानपूर्वक ऑपरेशन केल्यानंतर याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यश आले. याप्रकरणी नवी मुंबईच्या वाशी परिसरातून युगांडाच्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे.'

भारतामध्ये कोकेन घेऊन येणारा आणि ज्या महिलेला हे कोकेन देण्यात येणार होते ती महिला या दोघांविरोधात नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply