Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेची गुणवत्ता खूपच गंभीर, हायकोर्टाने व्यक्त केली चिंता; सरकारला सुनावले खडेबोल

 

Mumbai Air Pollution : मुंबईती हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मुंबईतील हवा इतकी खराब झाली आहे की हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेबाबत मुंबई हायकोर्टने चिंता व्यक्त केली आहे. हायकोर्टान याबाबत मुंबई महानगर पालिकेलाच खडेबोल सुनावले आहे.

मुंबईची हवा अत्यंत खराब झाली असून आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी चिंता मुंबई हायकोर्टाने व्यक्त केली. वाहतूक कोंडीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. वाहतुकीचे योग्य प्रकारे नियमन होत नसल्यानेच मुंबईमधील हवेची गुणवत्ता खालावत चालली असल्याचे हायकोर्टाने नमूद केले आहे.

पश्चिम द्रुतगती मार्गावर जरा जाऊन बघा हजारो गाड्यांच्या रांगा लागलेल्या असतात. या गाड्या सतत धूर फेकत असतात यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असते. याकडे आता लक्ष दिले नाही तर भविष्यात परिस्थिती अत्यंत गंभीर होईल. वाहतुकीचे नियमन योग्य प्रकारे कसे होईल यासाठी ठोस उपाय योजना करा, असं हायकोर्टाने राज्य सरकारला सांगितले.

Pune Crime : धक्कादायक! शरीरयष्टी वाढवण्यासाठी इंजेक्शनचा डोस, पुणे पोलिसांनी केली मोठी कारवाई

मुंबई हायकोर्टाच मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने यावेळी मुंबईतील प्रदूषणावरून राज्य सरकारला खडेबोल सुनावले. मुंबईतील प्रदूषणाचा मुद्दा हायकोर्टाने स्युमोटो सुनावणीसाठी दाखल करून घेतला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील १३१० रिक्त जागा भरल्या की नाहीत, अशी विचारणा देखील हायकोर्टाने यावेळी राज्य सरकारला केली. हायकोर्टाच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी सांगितले की, यातील काही जागा मंजूर केल्या आहेत. भरतीसाठी त्याची जाहिरात दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply