Mumbai Mega Block On Western Line : पश्चिम रेल्वेवर साडेसहा तासांचा ब्लॉक

Mumbai  पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामानिमित्त ब्लॉक मालिका सुरू आहे. सोमवारी मध्यरात्री साडेसहा तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. तर, मंगळवारी रात्री ११.३० ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत साडेसहा तासांचा ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११.३० ते रात्री ३.३० वाजेपर्यंत सर्व अप जलद मार्गावरील लोकल बोरिवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावरून धावतील. मंगळवारी रात्री ११ ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत सर्व अप आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस अंधेरी ते बोरिवली दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर धावतील. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून अनेक लोकल रद्द करण्यात येतील.

आज रात्री या लोकलवर परिणाम सोमवारी रात्री १०.२४ वाजता चर्चगेट-बोरिवली लोकल मालाडपर्यंत धावेल. रात्री १०.४४ वाजता विरार-अंधेरी जलद वातानुकूलित लोकल बोरिवलीपर्यंत धावेल. रात्री ११:५५ वाजता अंधेरी-भाईंदर जलद वातानुकूलित लोकल रात्री ११.२५ वाजता बोरिवलीवरून चालवण्यात येईल.

मंगळवारी पहाटे ४.०५ वाजता वांद्रे – बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत धावेल. ही लोकल पहाटे ४.३८ वाजता गोरेगाव-चर्चगेटसाठी जादा धीमी लोकल म्हणून चालवण्यात येईल. सकाळी ८.१२ वाजता बोरिवली-विरार लोकल नालासोपाऱ्यापर्यंत चालवण्यात येईल. सकाळी ९.०५ वाजता विरार-बोरिवली धीमी लोकल बोरिवली-अंधेरी-वांद्रे-दादर-मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर चर्चगेटपर्यंत धावेल.

Kala Ghoda In Mumbai : काळा घोडा परिसरात शनिवार रविवारी वाहनांना बंदी

सकाळी ९.१९ वाजता चर्चगेट-बोरिवली लोकल चर्चगेटवरून चर्चगेट-मुंबई सेंट्रल-दादर-वांद्रे-अंधेरी-बोरिवली दरम्यान जलद मार्गावर नालासोपारा पर्यंत धावेल. पहाटे ४.३२ वाजता बोरिवली-चर्चगेट धीमी वातानुकूलित लोकल अंधेरी-वांद्रे-दादर-मुंबई सेंट्रल-चर्चगेटपर्यंत जलद मार्गावर धावेल. पहाटे ४.१० भाईंदर-चर्चगेट जलद लोकल चर्चगेट पर्यंत धीम्या मार्गावर धावेल. पहाटे ४.४५ वाजता भाईंदर-चर्चगेट जलद लोकल धीम्या मार्गावर धावेल. सकाळी ७.२५ विरार-वांद्रे धीमी लोकल चर्चगेटपर्यंत चालवण्यात येईल. सकाळी ९.२३ वाजता चर्चगेट-विरार वातानुकूलित लोकल चर्चगेट-मुंबई सेंट्रल-दादर-वांद्रे-अंधेरी-बोरिवली-भाईंदर-वसई रोड-विरारदरम्यान जलद मार्गावर विरारपर्यंत धावेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply