
Mumbai : करोना काळातील बंदी आणि ओटीटीमुळे दुरावलेला प्रेक्षक या त्रस्त आर्थिक समीकरणातून बाहेर पडण्यासाठी देशभरातील बहुपडदा चित्रपटगृहांनी सुरू केलेली ‘राष्ट्रीय चित्रपट दिना’ची संकल्पना आज प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटासह सगळ्याच चित्रपटांना फळली. दरवर्षी २० सप्टेंबरला ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ जाहीर करण्यात आला असून या दिवशी फक्त ९९ रुपयांत चित्रपट पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येतो. त्यामुळे शुक्रवारी मुंबई-पुण्यासह देशभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी प्रेक्षकांची हाऊसफुल गर्दी अनुभवली.
‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (एमएआय) या बहुपडदा चित्रपटगृहांच्या संघटनेने ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ ही संकल्पना सुरू केली. या दिवशी ९९ रुपयांत चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते. यंदा तिसऱ्या वर्षीसुद्धा ही संकल्पना यशस्वी ठरली असून त्याचा फायदा महाराष्ट्रात शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाला मिळाला. शुक्रवारी ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘युध्रा’, ‘कहाँ शुरू कहाँ खतम’ आणि ‘ट्रान्सफॉर्मर्स वन’ हे नवीन चित्रपट प्रदर्शित झाले. तर ‘तुंबाड’ आणि ‘वीर झारा’ हे चित्रपट पुन:प्रदर्शित करण्यात आले असून ‘स्त्री २’ हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात सुरू आहे.
|
Pimpri : श्वान पथकाला मिळणार बळ; गुन्ह्यांची उकल करण्यास होणार मदत |
राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्ताने ९९ रुपयांत चित्रपट दाखवण्याची कल्पना आज प्रदर्शित झालेल्या सगळ्याच चित्रपटांना फायदेशीर ठरली. सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाला याचा सर्वाधिक फायदा झाला आहे. पहिल्या दिवशी प्रेक्षकांची अशी प्रचंड गर्दी याआधी कोणत्याच मराठी चित्रपटाला अनुभवता आली नव्हती’, अशी माहिती ‘मुव्हीटाईम सिनेमा’ समूहाचे सुनील घोलप यांनी दिली. यावर्षी दोनदा नवीन चित्रपटच प्रदर्शित न झाल्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी ९९ रुपयांत चित्रपट दाखवण्यात आले होते, मात्र राष्ट्रीय चित्रपट दिन हा दरवर्षी २० सप्टेंबरलाच असतो. याच दिवशी ‘नवरा माझा नवसाचा २’ हा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे या चित्रपटासह ‘तुंबाड’ आणि ‘स्त्री २’ या चित्रपटांना ८० ते ९० टक्के उपस्थिती होती, असेही त्यांनी सांगितले.
शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक गर्दी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाला होती. त्याचबरोबर चित्रपटगृहात सुरू असलेल्या अन्य सगळ्याच चित्रपटांच्या शोसाठी ८० टक्के उपस्थिती होती, असे जी ७ मल्टिप्लेक्स आणि मराठा मंदिरचे कार्यकारी संचालक मनोज देसाई यांनी सांगितले. देशभरातील चित्रपटगृहांमध्ये ९९ रुपयांत चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. सर्वभाषिक चित्रपटांना आज ९८ टक्के प्रेक्षक प्रतिसाद होता. पंजाबमध्ये ‘अरदास सरबत दे भले दी’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी गर्दी केली. मुंबईसह राज्यभरात ‘नवरा माझा नवसाचा २’ आणि ‘तुंबाड’ या चित्रपटांना सर्वाधिक प्रेक्षकसंख्या होती, अशी माहिती सिनेपोलिसचे वितरक किशोर मोरे यांनी दिली.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


