Mumbai : समुद्रात तरूणीचा आढळला मृतदेह, चेहऱ्यावर जखमा, मृतदेह तरंगताना पाहून मरिन ड्राईव्हवर मुंबईकर भयभीत

Mumbai : मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरतून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरूणीचा मृतदेह सापडला. तरूणीच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा होत्या. तरूणीचा मृतदेह समुद्रात सापडल्यानंतर कफ परेड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तसेच मृतदेह ताब्यात घेत तपासाला सुरूवात केली. तरूणीची हत्या झाली की आत्महत्या? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले आहे. मनिता गुप्ता (वय वर्ष २४) अशी तरूणीची ओळख पटली आहे. तरूणी २ दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे. तरूणी बेपत्ता झाल्यानंतर कफ परेड पोलिसांना कळवण्यात आले.

 

तरूणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या मिसिंगची केस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, तरूणीचा समुद्रात मृतदेह आढळल्यानंतर या घटनेमागील गुढ अधिक वाढले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

तरूणीचा मृत्यू नेमका कसा झाला? तिचा मृतदेह नेमका कुणाला आणि कधी सापडला? तरूणीची हत्या करण्यामागे कारण काय? तरूणीच्या चेहऱ्यावर जखमा कसल्या होत्या? तरूणीची हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, तरूणीची ओळख पटली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *