Mumbai : भावंडं खेळत होती, नराधमानं बागेत नेलं, १० वर्षीय चिमुकलीचे लचके तोडले; मुंबईत खळबळ

Mumbai : मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका १० वर्षीय चिमुकलीवर बागेत लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकीही देण्यात आलीये. ही धक्कादायक घटना अँटॉप हिल परिसरात घडली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नराधमाला अटकही करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घडली. चिमुकली त्याच परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. १० वर्षांची चिमुकली घराजवळ तिच्या भावासोबत घरातील परिसरात खेळत होती. दरम्यान, खेळत असताना आरोपी त्यांच्याजवळ पोहोचला. नंतर त्यानं दोघांना बागेत नेलं.

Maharashtra Politics : ...यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही, CM फडणवीसांनी मंत्र्यांना दिली तंबी

बागेत गेल्यानंतर, आरोपीनं मुलीच्या भावाला काही जेवण आणण्यासाठी पाठवले. नंतर मुलीवर अत्याचार केला. तिच्यावर जबरदस्ती केली. या घटनेबद्दल कुणालाही सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली. नंतर पीडित चिमुकली आपल्या घरी गेली.

नंतर मुलीनं आईकडे धाव घेत आपबिती सांगितली. पीडित मुलीच्या आईला घटनेची माहिती मिळताच तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिनं थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, ही संपूर्ण घटना २० जुलै ते २६ जुलै दरम्यान घडली. तक्रारीनंतर पोलिसांनी एक पथक पाठवून आरोपीला अटक केली.

चौकशीदरम्यान, आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *