Travel influencer Aanvi Kamdar : आनवी कामदार रील शूट करताना पडली नाही, मैत्रिणीचा दावा; तिच्या आईला कुणी जाऊन सांगतंय...

Mumbai : रायगडमधील कुंभे धबधब्याजवळ रील काढण्याच्या नादात मुंबईतील २७ वर्षीय ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आनवी कामदार हिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मात्र घटनेच्या वेळी आनवी व्हिडिओ शूट करत नव्हती, असा दावा तिची मैत्रीण आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर सुमन कोठारी हिने केला आहे. सुमनने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

आनवी कामदारचा अपघाती मृत्यू

theglocaljournal या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन प्रवास आणि लाईफस्टाईल विषयक ट्रॅव्हलॉग शेअर करणाऱ्या २७ वर्षीय आनवी कामदार हिचा १६ जुलै रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. ३५० फूट उंचीवरुन खोल दरीत पडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या आनवीच्या बचावकार्याला सहा तास लागले होते. मात्र उपचार सुरु असतानाच तिला मृत्यूने गाठले. यावेळी रील शूट करण्याच्या नादात तिचा पाय घसरल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र सुमन कोठारी हिने त्या धुडकावून लावल्या आहेत.

Mumbai Rain News Today: पुढील तीन-चार तास महत्त्वाचे, मुंबईत पावसाचा जोर वाढणार, वाचा Weather Report

सुमन कोठारी काय म्हणते?

आनवी कामदार हिच्यासंदर्भात फेक न्यूज पसरल्याचं पाहून माझ्या डोक्यात तिडीक गेली आणि प्रसारमाध्यमांवरील माझा विश्वास उडाला. तेही तुम्ही तिथे नसताना तिच्याविषयी कंड्या पिकवत आहे. आम्ही एक ट्रॅव्हल इन्फ्लूएन्सर सहकारी गमावली आहे. ती रील शूट करताना पडली, या अफवा पसरत आहेत. त्यावेळी नेमकं काय झालं, ते सांगायला आम्ही बांधील नाही. पण आम्हाला आमच्या मैत्रिणीची इमेज खराब होऊ द्यायची नाही. आम्ही नक्कीच सांगणार आहोत, की त्यावेळी नेमकं काय झालं, पण तोपर्यंत गप्प बसा, असं आवाहन सुमन कोठारीने केलं आहे.

या घटनेचा आनवीच्या आईला खूप मोठा धक्का बसला आहे. अशातच कोणी तिला जाऊन सांगतंय, की तुमची मुलगी रिल शूट करताना पडली ना? तिला काय वाटत असेल, याचा कधी विचार केला का? सहा तास लागले तिला बाहेर काढायला, तुम्हाला काही माहिती नसेल तर गप्प बसा, अशा शब्दात सुमनने सर्वांना फटकारलं आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply