
Mumbai : मुंबई महापालिकेने प्रकल्पबाधितांसाठी बांधलेली माहुल येथील घरे कर्मचाऱ्याना स्वस्तात देण्याचे ठरवलेले आहे. मात्र कर्मचाऱ्यांकडून या घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. माहुल येथील १३ हजार घरांपैकी ९,०९८ घरे मुंबई महापालिकेने विक्रीला काढली आहेत. त्याकरीता कर्मचाऱ्यांना कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र या घरांसाठी अद्याप केवळ दीडशे कामगारांनी अर्ज केले आहेत. पालिका प्रशासनाने या घरांच्या योजनेची सर्वत्र जाहिरातही सुरू केली आहे. मात्र कर्मचारी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
मुंबई महापालिकेने पूर्व उपनगरातील माहुल येथे प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधली आहेत. यापैकी काही घरांमध्ये प्रकल्पबाधित राहतात. तर बहुतांशी घरे रिकामी आहेत. या घरांच्या देखभालीसाठी महापालिकेला मोठा निधी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने ही घरे महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कामगारांना स्वस्तात विकत देण्याचे ठरवले आहे.
या योजनेअंतर्गत एक घर १२ लाख ६० हजार रुपयांत, तर दोन घरे २५ लाख २० हजार रुपयांत खरेदी करू शकणार आहेत. त्यासाठी म्युनिसिपल बँकेकडून ८.५० टक्के व्याज दराने ९० टक्के कर्जही दिले जाणार आहे. १७ मार्चपासून या घरांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. १५ एप्रिलपर्यंत कामगारांना अर्ज करता येणार आहे. मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ दीडशे अर्ज आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
|
|
मुंबई महापालिकेत हजारो स्वच्छता कर्मचारी कामाला असून ते मुंबई, ठाणे, विरार, वसई तसेच मुंबईपासून दूरवरच्या परिसरातून पहाटेच्या पाळीत काम करण्यासाठी येतात. या कर्मचाऱ्यांना मुंबईतच घरे मिळावी यासाठी महापालिकेने ही घरे तृतीय व चतुर्थ श्रेणी कामगारांकरीता विकायला काढली आहे. मात्र माहुलच्या घरांना कामगारांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पालिकेने आता या घरांच्या विक्रीसंदर्भात विविध ठिकाणी जाहिरात झळकवली आहे. घनकचरा विभागाच्या चौक्या, पालिकेची कार्यालये येथे या योजनेची जाहिरात लावण्यात आली आहे.
वार्षित सात कोटी देखभाल खर्च
सफाई कर्मचाऱ्यांसाठी माहुलमध्ये उभारण्यात आलेल्या घरांच्या देखभालीसाठी महापालिकेला वर्षाकाठी ७ कोटी रुपये खर्च येतो. ही घरे रिकामी राहिली तर त्याचा तोटा पालिकेलाच होणार आहे. त्यामुळे प्रशासन मुंबई महापालिकेतील कामगार संघटनांबरोबर चर्चा करून यातून मार्ग काढणार आहे.
त्याचबरोबर निवृत्त सफाई कर्मचारी ही घरे घेण्यास इच्छुक असतील तर त्यांनाही ती देण्याबद्दल विचार केला जाणार असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले. १) एवर स्माईल पी. ए. पी. संकुल, माहुल आंबा पाडा, आणिक गाव, येथील सदनिका खरेदीतत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. २) ही योजना केवळ पालिकेच्या तृतीय व चतुर्थ कर्मचाऱ्यांसाठी आहे. ३) अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल आहे. ४) २० एप्रिल रोजी आलेल्या अर्जदारांमधून सोडत काढण्यात येणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


