Mumbai-Pune Express Way: गुड न्यूज! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ८ पदरी होणार, वाहतूक कोंडीतून सुटका; कसा आहे प्लान?

Mumbai : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ८ पदरी होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास आणखी जलद होणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएसआरडीसीने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एमएसआरडीसीने राज्य सरकारला प्रस्तावा पाठवाल आहे. ७५ किलोमीटरचा मार्ग ८ पदरी करण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरी दोन्ही बाजूला एक-एक लेन वाढवण्यात येणार आहे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. सध्या या महामार्गावर जाण्या आणि येण्यासाठी प्रत्येक ३ म्हणजेच एकूण ६ मार्गिका आहेत. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीने मोठा निर्णय घेतला आहे. एमएसआरडीसी हा महामार्ग ८ पदरी करणार आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ त्याचा अंतिम आराखडा तयार करून निविदा मागवल्या जाणार आहेत.

Ration Shop : रेशन दुकानात मिळणार बचत गटाची उत्पादने; धाराशिव जिल्ह्यातून पहिला उपक्रम

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ८ पदरी झाल्यावर यामहामार्गावर होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. महामार्गावर अमृतांजन पुलाजवळ मोठी वाहतूक कोंडी होते. सकाळ आणि संध्याकाळी होत असलेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाश्यांचे हाल होते. याठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. महामार्ग ८ पदरी झाल्यानंतर वाहनधारकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे होणार ८ पदरी, कसा असेल प्लान? -

- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा सुमारे ९५ किलोमीटर लांबीचा देशातील पहिला प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे.

- ७५ किलोमीटरचा मार्ग ८ पदरी करण्यात येणार आहे.

- १३ किलोमीटरची मिसिंग लिंक देखील ८ मार्गिकांची असणार आहे.

- सध्या जाण्यासाठी ३ आणि येण्यासाठी ३ अशा ६ मार्गिका आहेत.

- जाण्यासाठी आणि येण्यासाठी आणखी एक-एक मार्गिका वाढवण्यात येणार.

-दररोज ५० ते ६० हजार वाहनांचा या मार्गावरून प्रवास

- वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्वाचा निर्णय

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply