Mumbai : प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेची नवीन नियमावली, पालन न करणाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा

Mumbai  : मुंबईतील हवेचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत असून प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे, महापालिकेच्या घनकचरा विभागाने प्रदूषण नियंत्रणासाठी यावर्षी नव्याने नियमावली तयार केली असून त्यात विकासकामांमुळे उडणाऱ्या धुळीचे प्रमाण रोखण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या नियमावलीमध्ये धूळ नियंत्रणासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सर्व सहाय्यक अभियंत्ये आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली असून नियमावलीचे पालन न केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून हिवाळा सुरू झाल्यानंतर मुंबईतील हवेचा स्तरही बिघडू लागतो. यंदाही मुंबईत हवेतील प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे, महापालिकेच्या घनकचरा विभागाने प्रदूषण नियंत्रणासाठी नवीन नियमावली आणली आहे. मुंबईतील प्रदूषणाचे प्रमूख कारण धूळ हेच आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून त्याच्या राडारोडातून ही धूळ वातावरणात पसरत आहे. राडारोडा रस्त्यावर तसाच पडून राहिल्यामुळे किंवा वाहनांच्या चाकांमुळे इतरत्र पसरत असल्यामुळे ही धूळ हवेने उडते व वातावरणात मिसळते. त्यामुळे, या धुळीच्या नियंत्रणासाठी नव्या नियमावलीत विशेष सूचना करण्यात आल्या आहेत.

Gold At Sea Beach : काय सांगता? समुद्रकिनाऱ्यावर सापडतंय चक्क सोनं; गोळा करण्यासाठी स्थानिकांची तुफान गर्दी



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply