Mumbai : अत्यवस्थ रुग्णांना जी.टी. रुग्णालयाचा लवकरच दिलासा; कसा ते वाचा…

Mumbai : जी. टी. रुग्णालयाच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील अतिदक्षता विभागात आणखी १० खाटांची भर पडणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई विभागामधील अत्यव्यस्थ रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रक्तशुद्धकरण केंद्रही सुरू करण्यात येणार आहे.

जी.टी. रुग्णालयाच्या आवारात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असून या रुग्णालयामध्ये अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. त्याचबरोबर विविध विभागाचे प्राध्यापक व डॉक्टरही उपलब्ध झाले आहेत. यापूर्वी जी. टी. रुग्णालयामध्ये फक्त १० खाटांचा समावेश असलेला अतिदक्षता विभाग होता. करोनाकाळात या विभागात अतिरिक्त १० खाटा वाढविण्यात आल्या. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने त्याच्याशी संलग्न असलेल्या जी. टी. रुग्णालय व कामा रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागासाठी प्रत्येकी पाच खाटा उपलब्ध करण्यात येत आहेत.

Pune : पुणे रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेखाली महिलेसह दोघांची आत्महत्या

यामुळे जी. टी. रुग्णालयामधील शस्त्रक्रिया विभाग आणि अत्यावश्यक विभागाच्या अतिदक्षता विभागातील खाटांच्या संख्येत वाढ होणार आहे. जी. टी. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या २५ होणार आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील फोर्ट, कुलाबा, क्रॉफर्ड मार्केट, गिरगाव, मरिन लाईन्स या परिसरातील सर्वसामान्य रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. अतिदक्षता विभागात खाट उपलब्ध नसल्यास या विभागातील रुग्णांना जे.जे. रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. मात्र वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर जी. टी. रुग्णालयामधील अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या वाढविण्यात येणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply