MSRTC News : ST कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी! महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ

मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या ३४ टक्के असलेला महागाई भत्ता आता ३८ टक्के झाला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाईभत्ता मिळावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसांपासून होत होती. अखेर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वाढीला परवानगी दिली आहे. त्यामुळे गणपती उत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळाली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना सध्या ३४ टक्के महागाई भत्ता मिळतो. एसटी कर्मचाऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या अभूतपूर्व संपानंतर शासनाकडून त्यांच्या पगारामध्ये आणि महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळाली अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीला आज हिरवा कंदील दाखवला. 

Solapur News : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धनगर समाज आक्रमक! विखे पाटलांच्या अंगावर उधळला भंडारा; नेमकं काय घडलं?

एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून वाढवून 38 टक्के करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. यामुळे राज्य शासनावर एकंदर 9 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाईभत्ता मिळावा, अशी मागणी करत होते. यानंतर आता त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply