MSRTC : समृद्धी महामार्गावरुन उद्यापासून नागपूर- शिर्डी बस; स्वस्तात प्रवास,

हिंदुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरुन उद्यापासून (गुरुवार) एसटी महामंडळाच्या नागपुर ते शिर्डी बस सेवेस प्रारंभ हाेत आहे. एसटी महामंडळामुळे कमी वेळात आणि कमी दरात सामान्य नागरिकांना आता समृद्धीचा प्रवास आणि साईंचे दर्शन घडणार आहे.

हिंदुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते लाेकार्पण झाले. आता समृध्दी महामार्गवरुन एसटी महामंडळाने नागपुर ते शिर्डी बस सेवा सुरू करण्याचा निर्धार केला आहे.

उद्यापासून या महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी अशी बस सेवा प्रवाशांसाठी केवळ तेराशे रुपयांत असणार आहे. नागपूरच्या गणेशपेठ आगारात दोन स्लीपर बसेस प्राप्त झाल्या आहेत. ही बस रात्री नऊ वाजता सुटेल आणि पहाटे पाच वाजता शिर्डीत पाेहचले. तसेच रात्री नऊहून शिर्डी येथून सुटेल आणि दुस-या दिवशी नागपूरात पाेहचले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *