पुणे : मनसेला धक्का; वसंत मोरेंचे कट्टर समर्थक जाणार शिंदे गटात!

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांमधली धुसफूस आता काही लपून राहिलेली नाही. अंतर्गत राजकारणामुळे पुणे मनसेमध्ये फूट पाहायला मिळाली. यानंतर आता मनसेचा एक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहे.

मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे निलेश माझिरे यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची नाराजी काही लपून राहिलेली नव्हते. मनसे माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी माझिरे यांनी आक्रमक होत, आपण ४०० कार्यकर्त्यांसह पक्ष सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं.

या सगळ्या वादानंतर वसंत मोरे आणि माझिरे यांच्या कटुता निर्माण झाली होती. त्यानंतर आता आज निलेश माझिरे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईत वर्षा बंगल्यावर आज संध्याकाळी हा पक्ष प्रवेश होणार आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *