पुणे : वीज तोडल्याने महावितरण कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की ; कोंढवा भागातील घटना; एका विरोधात गुन्हा

पुणे : वीज तोडल्याने महावितरणच्या कार्यालयात शिरुन एकाने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी जितेंद्र दिनकर साळवे (रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणचे कर्मचारी निवास आळवेकर (वय ४२) यांनी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साळवेने वीज बिल भरले नसल्याने वीज तोडण्यात आली होती. त्यानंतर साळवे कोंढव्यातील महावितरणच्या कार्यालयात गेला. वीज पुरवठा का तोडला, अशी विचारणा करुन त्याने महावितरणच्या कार्यालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. आळवेकर यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आळवेकर यांना धक्काबुक्की करुन साळवे पसार झाला. सरकारी कामात अडथळा आणणे तसेच मारहाण केल्या प्रकरणी साळवे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले तपास करत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply